मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची गणना जगातील श्रीमंत कुटुंबात होते. अंबानी घराण्याची श्रीमंती आपण सगळे सोशल मीडियावर रोज पाहतच असतो. पण तुम्हाला या कुटुंबातील स्टाफचा पगार आणि सोयसुविधांबद्दल कळल्यास इथे नोकरी कशी मिळते हे जाणून घ्यावसं वाटेल.
अंबानी यांच्या घरातील जवळपास 600 स्टाफ आहेत. तर स्टाफची मुलं ही परदेशात शिकतात. जेवणासाठी मदतनीस करणाऱ्यांचा पगार हा 2-3 लाखांपासून सुरु होतो.
अंबानींच्या घरात स्वयंपाकी व्हायचं असेल तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला काही टेस्टही द्यावा लागतात.
नीता अंबानी यांच्या ड्रॉयव्हरला हा 2 लाखांच्या घरात आहे. म्हणजे वर्षभराचा पगार हा 24 लाखांपर्यंत जातो.
अंबानींना सध्या Z+ सुरक्षा आहे, ज्याचा खर्च त्यांच्या तिजोरीतून होतो. सरकारी सुरक्षेव्यतिरिक्त, खाजगी रक्षक आहेत ज्यांना 14k ते 55k पर्यंत पगार आहे.
अंबानीचे दोन वैयक्तिक सहाय्यक असून IIM बेंगळुरू कडून निवडलेले, सुरभी गर्ग आणि प्रणय जैन आहे. मुकेश अंबानी यांचे PA हे 25LPA पगार कमावतात.
त्याशिवाय या स्टाफला विमा, शिक्षण भत्ता मिळतो. त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची सोयहीदेखील अंबानी कुटुंबातून होते.
इथे नोकरी मिळवण्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागते. शिवाय मॅनेडमेंटची पदवी असणं बंधनकारक आहे. अगदी त्यांना लेखी परीक्षा देखील द्यावी लागते.