जे लोकं सतत आपल्या जीवनात नकारात्मक विचार करतात त्यांना टॉक्सिक लोकं असं म्हटलं जात. ही लोकं कायमच जीवनात अशांत असतात आणि आपल्याही जीवनात त्याचा प्रभाव पडतो. मेंटल आणि इमोशनल हेल्थसाठी हे अतिशय घातक असतं.
काही लोकं आपल्याला जीवनावर अतिशय हावी होत आहेत. तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला सगळी कामे करायला लावतात. या पद्धतीचे लोकं तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात.
आजूबाजूला अशी अनेक खोटी माणसे असतात. ज्यांच्या ओठावर एक आणि पोटात एक असतं. या लोकांपासून कायम दूर राहा. डोतं शांत ठेवण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. रिलेशनशिपमध्ये या लोकांमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो.
अंहकारी लोक कायम फक्त स्वतःचा असा स्वार्थी विचार करतात. त्यांना कुणाबद्दलच सहानुभूती किंवा आपुलकी नसते. ही लोकं कुणाशीही भावनिक नातं निर्माण करू शकत नाहीत.
काही लोकं आपल्या नकारात्मक विचार आणि कृतीतून आपली एनर्जी अगदी मुळापासून उपटून टाकतात. यामुळे सतत आपल्याला रिकामं आणि नकारात्मक वाटतं. सकारात्मक राहायचं असेल तर यांना लांबच ठेवा.
या पद्धतीचे लोकं प्रत्येकवेळी ड्रामा करतात. अगदी अटेंशन मिळवण्यासाठी यांचा खटाटोप सुरु असतो. या लोकांचा आपल्या मेंटल हेल्थवर खूप परिणाम होतो. अगदी लक्षवेधून घेण्यासाठी हे कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात.