Love Marriage असो किंवा मग Arranged Marriage असो. काही विवाहित लोक पुन्हा प्रेमात पडतात. विवाहबाह्य संबंध हे नेमकं सुरु होतात याबद्दल अमेरिकन असोसिएशन फॉर मॅरेज अँड फॅमिलीने एक सर्व्हे केला.
या सर्व्हेनुसार सर्वाधिक विवाहबाह्य संबंध हे ऑफिसमध्ये सुरु होतात. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे एका ठिकाणी तुम्ही अनेकांशी भेटतो आणि त्या व्यक्तींसोबत 8 ते 10 तासापेक्षा रोज अधिक वेळ घालवतो.
आजकाल पुरुष असो किंवा महिला एकत्र जिममध्ये व्यायाम करताना दिसतात. या ठिकाणी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या अनेक प्रकरणं सुरु होतात. जिममध्ये सर्वाधिक महिला विवाह बाह्य संबंध ठेवताना या अहवालात समोर आलं आहे.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सुरू होण्यात सर्वात मोठं कारण सोशल मीडिया ठरला आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक एकमेकांशी पुन्हा कनेक्ट होतात. शिवाय हे सर्वात सोप आणि सहज मार्ग आहे जिथे तुम्ही पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडतात. इथे तुम्हाला भावनिक आधारही मिळतो.
हो, पार्टीज किंवा फंक्शनमध्ये तुम्ही अनेक लोकांशी भेटता अगदी पूर्वी कधी भेटलेल्या यांना पुन्हा भेटता आणि त्यांच्याबद्दल आकर्षण आणि ओढ निर्माण होते. अशातून पार्टीजमधून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सुरु होतात.
कधी कधी एकाच सोसायटीमध्ये राहत असल्यामुळे तुमचा एकमेकांशी परिचय होतो. सतत डोळ्यासमोर राहिल्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण आणि ओढ निर्माण होते. त्यातून विवाहबाह्य संबंधाला सुरुवात होते. जुन्या क्रश अचानक समोर आल्यावरही तुम्ही त्या व्यक्तीचा प्रेमात पडू शकता.