कडधान्यं ही पचायला जड असतात. त्यामुळेच गरोदरपणात कडधान्य कच्चीच खावू नयेत.
पपई ही उष्ण असते. त्यामुळेच गरोदर महिलांनी पपई खाणं टाळावं
गरोदर महिलांनी मद्यापासून दूर राहणं फायद्याचं ठरतं.
अननसही गर्भधारणेच्या काळात सेवन करणं होणाऱ्या मातेच्या आरोग्यासाठी धोकादायक असतं.
कॉफीमध्ये आढळणारा कॅफेन हा घटक गरोदर महिलांसाठी हानीकारक असतो. त्यामुळे अती जास्त प्रमाणात कॅफेनचं सेवन टाळावं.
कच्च दूध पिणं गरोदर महिलांनी टाळलं पाहिजे. कच्च्या दूधाच्या माध्यमातून आरोग्या संदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात.
अशुद्ध पाण्याच्या माध्यमातून आरोग्यासंदर्भातील गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
गरोदर महिलांनी गर्भधारणेच्या काळात सॉफ्ट चिजचं सेवनही टाळावं.
Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य तो निर्णय घ्यावा.