वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? मग आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

Apr 02,2024


वेबएमडीच्या रिपोर्टनुसार रोजच्या आहारात काही फूड कॉम्बिनेश्न्सचा समावेश केला तर तब्येत चांगली राहण्यास मदत होऊ शकते.

डाळ आणि ब्राऊन राईस

डाळीत भरपूर फायबर्स असतात. ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. याऊलट ब्राऊन राईस हृदयाशी सबंधित आजार कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

मिलेट्स- धान्य

मिलेट्सचा आहारात समावेश केल्यानं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. यात भरपूर फायबर्स असतात आणि बाजरी हृदयाच्या आजारांचा धोका कमी करते.

बदाम आणि दही

बदाम आणि दह्याचे कॉम्बिनेशन हाय कोलेस्टेरॉलची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असून यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.

हळद आणि काळी मिरी

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हळद आणि काळी मिरीची कॉम्बिनेशन फायदेशीर ठरते. तुम्ही कच्य्या हळदीचाही वापर करू शकता. काळ्यामिरीससह याचे सेवन केल्यास चांगले फायदे मिळतात.

फॅटी- फिश

सॅल्मन, मॅकेरल, ब्लॅक कॉड यासारखे फॅटी मासे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात.

VIEW ALL

Read Next Story