बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा मुलगा आर्यन खान आपली लाईफ प्रायव्हेट ठेवतो. पण तरीही या ना त्या कारणाने तो चर्चेत असतो.

सध्या परदेशी गर्लफ्रेंडमुळे आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आर्यनचं नाव ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल Larissa Bonesi हिच्याशी जोडलं जातंय.

आर्यन आणि लॅरिसाने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण लॅरिसा कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

लॅरिसा बोन्सी हिचा जन्म ब्राझिलमध्ये झाला. ब्राझिलची ती प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे

लॅरिसा बोन्सी हीने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तेलुगु अॅक्शन कॉमेडी चित्रपट 'थिक्का'मध्ये तीने भूमिका साकारली होती.

पंजाबी गायक गुरु रंधावा याच्या सुरमा-सुरमा गाव्यातही लॅरिसाने काम केलंय. याशिवाय स्टेबिन बेन, टेरेंस लुईस यांच्याबरोबरही तीने म्यूझिक व्हिडिओ केलेत.

लॅरिसा मिस्टर खिलाडी अक्षय कुमारच्या 'सुबह होने ना दे' या गाण्यातही झळकली होती. आर्यन खानच्या D'yavol कॅम्पेनमध्ये लॅरिसाने सहभाग घेतला होता.

VIEW ALL

Read Next Story