आयपीएलच्या मॅचमध्ये आता नवे खेळाडू झळकणार आहेत. गुजरात टायटन्सने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जॉन्सनला 10 करोडला खरेदी केले.
त्याचबरोबर 8.4 कोटींना चेन्नई सुपरकिंग्सने समीर रिजवीला खरेदी केलं.समीरने याआधी युपी प्रिमियर लीगमध्ये दमदार कामगिरी केली होती.
झारखंडचा कुमारची खेळी पाहून दिल्ली कॅपिटले माजी कोच सौरव गांगुली प्रभावित झाले होते. दिल्ली कॅपिटल्सने 7.2 कोटींना कुमार कुशाग्र या खेळाडूला खरेदी केले.
मुंबई इंडियन्सने गेराल़्ड कोएट्जी या अफ्रिकन खेळाडूला 5 कोटींना खरेदी केले. याआधी 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या वतीने गेराल़्ड खेळला होता.
4.8 कोटींना मुंबई इंडियन्सच्या वतीने नुवान तुषारा या श्रीलंकन खेळाडूला खरेदी केले. नुवान तुषारा याआधी पीएसएलमध्ये खेळला होता.
रचिन रवींद्रला 1.8 कोटीला चेन्नई सुपरकिंग्सने खरेदी केले. न्युझीलंडचा हा खेळाडू स्पिनर गोलंदाजीसाठी ओळखला जातो.
गुजरात टायटन्सने 50 लाख रुपयांना अफगाणिस्तानच्या ऑलराउंडर अजमतुल्लाह ओमरजई खरेदी केले. अजमतुल्लाह ओमरजई हा हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट असल्याचं म्हटलं जातं.