याच कामगिरीच्या जोरावर त्याची 2022 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात निवड झाली. पण त्यातही तो खास कामगिरी करु शकलेला नव्हता.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिनेश कार्तिकने 16 सामन्यात 55 अॅव्हरेजने तब्बल 330 धावा केल्या होत्या.
फलंदाजीत सहाव्या क्रमांकावर येणाऱ्या कार्तिकचा आठ सामन्यात हायेस्ट स्कोर आह 28 धावा.आरसीबीने दिनेश कार्तिकवर तब्बल 5.50 कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं होतं.
दिनेश कार्तिक या हंगामात आरसीबीसाठी केवळ विकेटकिपर म्हणून कामगिरी पार पाडतोय. यातही त्याची कामगिरी गचाळ झालीय.काही सामन्यात DRS घेताना गोलंदाजांना तो सल्ला देऊ शकत नसल्याचं दिसून आलंय.
त्यामुळे बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणारा दिनेश कार्तिक आता स्वत:च फिनिश झाला आहे का असा सवाल क्रिकेट चाहते विचारतायत.
बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सकडून खेळणारा दिनेश कार्तिक यंदाच्या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळला आणि यात त्याने केवळ 83 धावा केल्यात.
टीम इंडियाचा बेस्ट फिनिशर अशी ओळख असलेला दिनेश कार्तिक यंदाच्या आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे.