त्याआधी 22 एप्रिलला पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्याने 26 चेंडूत 56 धावांची तुफान खेळी केली होती.
सूर्याने गेल्या चार सामन्यात तब्बल 191 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 29 चेंडूत 55 धावा केल्या होत्या.
सूर्या यंदाच्या आयपीएल हंगामात 9 सामने खेळला आहे. यात त्याने 29.67 च्या स्ट्राईक रेटने 267 धावा केल्या आहेत.
सूर्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाबविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला. त्यांना त्यांच्याच मैदानावर 5 विकेटने धुळ चारली.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात धुवाँधार फलंदाजी करत अवघ्या 31 चेंडूत 66 धावांची तुफान खेळी केली
गेल्या काही सामन्यात सूर्याच्या फलंदाजीला खराब फॉर्मचं ग्रहण लागलं होतं. पण आता हे ग्रहण दूर झालं आहे.
ICC टी20 क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे.