अर्जुनचा आयपीएलमध्ये धमाका

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नुकतंच आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने मुंबईला विजयी मिळवून दिला होता.

सचिन मुंबई इंडियन्सचा मेंटोर

सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सशी मेंटोर म्हणून जोडला गेलाय. सोळाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिले दोन साने गमावल्यानंतर पुढचे सलग तीन सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत वाढ

'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. भारताबरोबरच परदेशातही त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे.

क्रिकेटचा देव भेटला

याचे फोटो एमसी स्टॅनने शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने म्हटलं, आज क्रिकेटचा देव भेटला. लहानपणापासून सचिन तेंडुलकरला फक्त टीव्हीवर बघितलं होतं. आज प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली.

इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडिओ व्हायरल

एमसी स्टॅनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात एमसी स्टॅन गोलंदाजीवर सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना दिसत आहे. चाहतेही हा सामना एंजॉय करताना दिसतायत.

सचिन आणि एमसी स्टॅन एकत्र

एका कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि रॅपर एमसी स्टॅन एकत्र आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सचिन तेंडुलकरचा व्हिडिओ व्हायरल

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेला आता एकवीस दिवस उलटून गेलेत. यादरम्यान सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story