देशभरात मद्यशौकिनांची काही कमी नाही.
देशात मद्य पिणाऱ्या लोकांची संख्या बरीच आहे.
बरेच लोक असेही आहेत ज्यांना मद्याचे व्यसन असते आणि ते दररोज मद्यपान करतात.
देशात जवळजवळ 16 कोटी लोक मद्याचे प्राशन करतात.
अरुणाचल प्रदेश याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
तेथे 53% हून अधिक लोक मद्य पितात.
त्यापाठोपाठ तेलंगणा राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तेथे 43% हून अधिक लोक मद्य पितात.
मद्य पिण्याच्या बाबतीत भारतीय महिलाही काही कमी नाहीत.
अरुणाचल प्रदेशात 15 वर्षांहून वरील वयाच्या महिलांमधील 24% महिला मद्याचे सेवन करतात.