रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स का ठेवलेले असतात?

Soneshwar Patil
Sep 04,2024


तुम्ही देखील अनेक वेळा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स बसवलेले पाहिले असतील.


रेल्वे ट्र्रॅकच्या बाजूला बसवलेल्या अॅल्युमिनियम बॉक्सला एक्सल काउंटर बॉक्स म्हणतात.


यामध्ये एक स्टोरेज डिव्हाइस आहे. जे रेल्वे ट्रॅकशी जोडलेले असते. हा बॉक्स रेल्वेच्या ट्रॅकवर 3 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर बसवलेला असतो.


हे अपकरण ट्रेनची एक्सल मोजण्याचे काम करते. जेणेकरून ट्रेनच्या सुरुवातीच्या चाकांची संख्या ही पुढच्या स्टेशननंतर देखील तितकीच आहे का हे मोजण्याचे काम करते.


कारण ट्रेनच्या प्रवासादरम्यान अपघात झाला आणि एक किंवा दोन डबे वेगळे झाले. तर हा 'एक्सल काउंटर बॉक्स' एक्सल मोजतो आणि निघून गेलेल्या ट्रेनमध्ये किती चाके कमी आहेत हे सांगतो.


हा 'एक्सल काउंटर बॉक्स' ट्रेन जात असताना त्याचे एक्सल मोजतो. त्याची माहिती लगेच पुढील बॉक्सवर पाठवतो.


ट्रेनचा डबा वेगळा झाल्यावर एक्सलची संख्या कमी होईल. अशा परिस्थितीत अपघात टाळण्यासाठी ट्रेन वेळेत थांबवण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story