वनिता खरात 10 वर्षांपूर्वी कशी दिसायची? पाहा फोटो

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून वनिता खरातला ओळखले जाते. या कार्यक्रमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

वनिताने नुकतंच तिचा 10 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे.

तिचा हा फोटो एका एकपात्री अभिनय स्पर्धेदरम्यानचा आहे.

या फोटोला कॅप्शन देताना तिने "ह्या वनिताला आज खूप आनंद होत असेल", असे म्हटले आहे.

त्याबरोबरच तिने आठवणी, 10 वर्षांपूर्वीचा फोटो, एकपात्री, अजून खूप बाकी आहे, ये तो सिर्फ शुरुवात है, असे काही हॅशटॅगही शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोवर तिचा पती सुमित लोंढेनेही कमेंट केली आहे.

सुमितने या फोटोवर कमेंट करताना 'छोटा बाबू' असे म्हटले आहे. त्यावर तिने हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story