चटपाल, जम्मू कश्मीर

काश्मीर खोऱ्यातील शांगस जिल्ह्यात चटपाल हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. फार कमी लोकांना या पर्यटन स्थळाबाबत माहिती आहे. तुम्ही या ठिकाणी थंड पाण्याच्या नदीकाठचा आणि हिरव्यागार कुरणांचा आनंद घेऊ शकता.

Apr 13,2023

अस्कोट, उत्तराखंड

उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरण्याचा प्लॅन असेल तर अस्कोट या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. हे हिल स्टेशन उत्तराखंडच्या पूर्वेला भारत-नेपाळ सीमेजवळ आहे. हे सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे.

केम्म्रगुंडी, कर्नाटक

तुम्हाला फिरायचे असेल तर तुम्ही कर्नाटक मधील केम्म्रगुंडीहिल स्टेशनला भेट देऊ शकता. बंगळुरूपासून सुमारे 273 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर धबधब्यांचा आनंद घेऊ शकता.

कल्पा , हिमाचल प्रदेश

उत्तर भारतातील कल्पा हे एक सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्ही सुट्ट्यांमध्ये आवश्य भेट द्या. सतलज नदी घाटातील हे शहर सफरचंदाच्या बागा, घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग करू शकता.

तुंगी, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तुंगी हे सुंदर पर्यटन ठिकाण आहे. पुण्यापासून 85 किमी अंतरावर वसलेले हे पर्यटन स्थळ आहे. पवना तलावावर ट्रेकिंग करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

VIEW ALL

Read Next Story