मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, गुलाब पाण्यात अँटी सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. अशा स्थितीत दुखापत झालेल्या ठिकाणी तुम्ही गुलाब जल वापरू शकता. (All Photo Credit : File Photo) (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
गुलाबपाणीमध्ये अँटी-डिप्रेशन आणि अँटी-एंझाईटी गुणधर्मही भरपूर असतात. अशा परिस्थितीत गुलाब जलचा वापर करू शकता. यामुळे स्ट्रेस कमी होईल. याशिवाय तुम्हाला शांत झोपही लागेल.
गुलाब जलचे सेवन केल्यास मेंदू निरोगी राहिल. गुलाबाच्या सुगंधानं डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्या दुर होतात. यासोबतच गुलाबपाणी हे अल्झायमरसाठी सर्वोत्तम उपचार मानले जाते.
गुलाब जलचा वापर हा आय ड्रॉप म्हणून करू शकता. गुलाब जल वापरल्यास तुमचे डोळे कोरडे पडणार नाही. डॅक्रायोसायटिक्स, पेटेरेजियम आणि मोतीबिंदू सारख्या समस्या देखील होण्याची शक्यता कमी असते.
गुलाब जलचे सेवन केल्यानं घसादुखीपासून सुटका मिळते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही.
गुलाबपाण्यामध्ये असलेले अँटी-सेप्टिक गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत गुलाब जल पिल्यानं तुम्हाला संसर्ग होणार नाही.
गुलाब जलचे सेवन केल्यास पचन प्रक्रिया उत्तम राहते. पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.