मडक्यात कधीही पाण्याचा ग्लास किंवा पाणी बाहेर काढण्याचं भांडं टाकून ठेवू नका. यामुळे ते भांडं चिकट होतं.
मडकं स्टँडवर ठेवा, जेणेकरुन ते हलणार नाही आणि आतील पाणी थंड राहील.
मडक्याचं तोंड कधीही उघडं ठेवू नका. त्याच्यावर झाकण ठेवल्याने पाणी स्वच्छ आणि थंड राहतं.
जर मडक्यातून थंड पाणी मिळावं अशी इच्छा असेल तर तो सावलीच्या आणि हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा.
जर तुमच्या मडक्याच्या नळ्यातून पाणी गळत असेल तर तो तात्काळ दुरुस्त करुन घ्या. पाणी गळत असल्याने तो भाग लवकर खराब होऊ शकतो.
जर तुमच्या मडक्याला वास येत असेल तर तो लगेच धुवून घ्या अन्यथा हा वास कायमचा तसाच राहू शकतो.
जर तुम्हीदेखील मडक्याचा वापर करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मडकं आणि पाणी दोन्ही खराब होऊ शकतात.