गुंतवणूकदार होणार मालामाल! मार्केटमध्ये येतोय 'या' 6 कंपन्यांचा IPO

शेअर मार्केटमध्ये येत्या आठवड्यात एकूण 6 कंपन्यांच्या आयपीओवर गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

यातील एक मेनबोर्ड कंपनी आहे तर 5 कंपन्यांचा IPO हा लहान असणार आहे.

चला तर पाहुया कोणत्या 6 कंपन्यांचा IPO बाजारात दाखल होणार आहेत.

दिल्लीच्या बीएलएस ई- सर्विसेज कंपनीचा आयपीओ हा 30 जानेवारी ते 1 फेब्रूवारीपर्यंत खुला असेल. या आयपीओची किंमत 129 ते135 प्रति शेअर असेल.

मेगार्थम इंडक्शनचा आयपीओ 29 जानेवारीला येणार असून हा शेअर 100 ते108 रुपयांना या प्राईस ब्रॅंडवर येईल. 31 जानेवारीला हा शेअर बंद होईल.

हर्षदीप हार्टिको कंपनीचा आयपीओ 29 ते 31 जानेवारीमध्ये सुरु होईल. या आयपीओची किंमत 42 ते 45 अशी प्रति शेअर असेल.

मयंक कॅटल फूडचा आयपीओ 29 ते 31 जानेवारीपर्यंत असणार आहे. हा शेअर 108 रुपयांच्या किंमतीत तुम्हाला खरेदी करता येईल.

बवेजा स्टूडिओचे शेअर 170 ते 180 रुपयांना असणार असून यांचा आयपीओ 29 जानेवारीपासून सुरु होईल.

ग्रेबियल पेट स्ट्रेप्सचा आयपीओ 31 जानेवारी ते 2 फेब्रूवारीपर्यंत ओपन असेल. याचा शेअरची किंमत प्रति 101 रुपये असेल.

पुढच्या आठवड्यात 10 कंपन्यांची लिस्टिंग होणार असल्याची माहिती समोर आलीये.

VIEW ALL

Read Next Story