देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयकडून पुन्हा एकदा ठेवीदारांसाठी एक दमदार योजना लाँच करण्यात आली आहे.
पर्यावरणस्नेही प्रकल्पांना चालना देत त्यासाठी आर्थिक पाठबळ उभं करणं हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट हीच ती योजना.
एसबीआयची ही ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट स्कीम रेग्युलर टर्म स्कीम योजनेप्रमाणंच असून त्यामध्ये निश्चित काळासाठी जमा रकमेवर पूर्व निर्धारित व्याज मिळतं.
एसबीआयच्या या योजनेमध्ये देशाचे नागरिक, non individuals आणि एनआरआय मंडळींना गुंतवणूक करता येते.
एसबीआयच्या या योजनेअंतर्गत 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवसांच्या निश्चित ठेवीवर विविध रुपांमध्ये व्याजदर मिळतो.
1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या एफडीवर सामान्य ठेवीदारांना बँकेकडून 6.65 आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.15 टक्के व्याज मिळत आहे.
2222 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.40 आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याज दिलं जात आहे. या योजनेमध्ये तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता, इथं कमाल मर्यादा लागू नाही.