जगभरातील Top 10 सर्वात अवघड परिक्षांच्या यादीमध्ये भारताच्या तीन परिक्षांचा समावेश आहे. तर, या यादीतील पाच परिक्षा या अमेरिकेत घेतल्या जातात.

युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग परीक्षा USMLE हे देखील सर्वात कठिण परिक्षा आहे. ही परीक्षा राज्य वैद्यकीय मंडळ (FSMB) आणि राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षक मंडळ (NBME) द्वारे घेतली आहे.

कॅलिफोर्निया बार परीक्षेत वकील परीक्षांचा समावेश असतो. सामान्य बार परीक्षेत पाच निबंध प्रश्न, मल्टीस्टेट बार परीक्षा (MBE) आणि एक परफॉर्मन्स टेस्ट (PT) असते.

UPSC ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही कठीण परीक्षांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

MENSA ही जगातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. MENSA संस्थेच्या सदस्यांचा IQ लोकांच्या 98% पेक्षा जास्त आहे.

भारताची IIT-JEE जगातील ही दुसरी सर्वात कठीण परीक्षा आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.

The Graduate Record Exam (GRE) ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. परदेशात शिकण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE), ही अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही ऑनलाइन परीक्षा असून भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही घेतली जाते.

चिनी महाविद्यालयात प्रवेशासाठी Gaokao परीक्षा घेतली जाते.

चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट (CFA) परीक्षा ही बिझनेस क्षेत्रातील सर्वात कठीण परीक्षा आहे. दरवर्षी 100 हून अधिक देशांतील एक लाखाहून अधिक उमेदवार CFA परीक्षा देतात.

Cisco Certified Internetworking Expert अर्ताथ CCIE परीक्षा ही वित्त क्षेत्रातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. US मध्ये ही परीक्षा घेतली जाते.

VIEW ALL

Read Next Story