नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बॅंकांवर भारतीय रिझर्व्ह बँक कठोर कारवाई करत आहे
मुंबईतील सहकारी बॅंक आरबीआयच्या देखरेखेखाली आली आहे.
आरबीआयने मुंबईतील The City Co-operative Bank Ltd या बॅंकेचा परवाना रद्द केला आहे.
आरबीआयने त्यांना बॅंकेशी संबंधित सर्व कामे त्वरित थांबवण्याचा आदेश दिला आहे.
सेंट्रल बॅंकेच्या म्हणण्यानुसार ही बॅंक कोणत्याही नियमांचं पालन न करता सातत्याने दुर्लक्ष करत होती. तसंच त्यांच्याकडे पुरेशी रक्कम देखील नव्हती.
अनेकदा इशारे देऊनही सुधारणा न झाल्याने आरबीआयने कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर या बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल, हे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.
ज्या ग्राहकांचे खाते या बॅंकेत आहे त्यांना 5 लाखांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे.
खात्यात 10 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा असल्यास त्या ग्राहकाला सध्या फक्त 5 लाख रूपयेच परत मिळतील.