अशी चुलत बहीण सर्वांना मिळो! कंगनाने चुलत भावाला लग्ना गिफ्ट केला आलिशान घर

कंगना रणौतनं तिच्या चुलत भावाला घर भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे तिची स्तुती होत आहे. त्याशिवाय तिनं स्वत: हे घर डिझाइन देखील केलं आहे.

कंगनाचा चुलत भाऊ वरुण रणौतनं नुकताच साखरपुडा केला आहे. ज्यात कंगनानं देखील हजेरी लावली होती.

कंगनानं त्याला छोटं मोठं गिफ्ट नाही तर चंडीगडमध्ये थेट आलिशान घर गिफ्ट केलं आहे.

वरुणनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यासोबत लिहिलं की आपल्या लोकांसोबत नव्या घरात नवी सुरुवात. धन्यवाद.

'कंगना ताई तू आल्यानं घराची आणि कार्यक्रमाचा उत्साह आणखी वाढला. इतकं सुंदर घर आणि तुझ्या प्रेमाचे आणि आशीर्वादासाठी धन्यवाद.'

वरुणनं सांगितलं की कंगनानं फक्त घर गिफ्ट केलं नाही तर त्यासोबत स्वत: डिझाइन देखील केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story