शर्ट ही एक अशी गोष्ट आहे जो मुलं आणि मुली दोघेही परिधान करतात.

पण तुम्ही मुली आणि मुलांचा शर्ट पाहिलात तर त्याच्यात एक मुख्य फरत असतो. तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल.

मुलांच्या शर्टावरील बटणं उजव्या बाजूला असतात, तर मुलींच्या शर्टावर मात्र ती डाव्या बाजूला असतात. यामागे अनेक कारणं आहेत.

एक दावा असा आहे की, नेपोलियनला आपल्या वेस्टकोटमध्ये दोन बटणांच्या मधे हात ठेवून उभं राहायला आवडायचं. यावरुन महिला त्यांची खिल्ली उडवत. अशात त्यांनी महिलांच्या शर्टची बटणं डाव्या बाजूला लावण्याचा आदेश दिला.

असं म्हटलं जातं की, मध्यकाळात शर्टाला बटण नसायचे. शर्टाच्या दोन्ही भागांना क्लिप, लेस किंवा पीनने जोडलं जायचं. 13, 14 व्या शतकात शर्टाला बटण लावण्याची पद्धत सुरु झाली. श्रीमंत लोक सोने, चांदी आणि हातीच्या दाताचे बटण लावत.

श्रीमंतांच्या पत्नींना हेल्परच कपडे घालण्यात मदत करत असत. जेव्हा हेल्पर कपडे घालत असत तेव्हा त्या समोरच्या दिशेला असल्याने बटण लावताना त्रास व्हायचा.

महिला मुलांना काखेत उचलण्यासाठी डाव्या हाताचा वापर करतात. अशात त्यांना ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी बटण उघडताना त्रास होतो. यामुळे बटणं डाव्या बाजूला लावण्यास सुरुवात झाली.

तेव्हापासून महिलांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला लावण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून अशीच पद्धत आहे.

काही एक्स्पर्ट तर महिला आणि पुरुषांमधील अंतर दर्शवण्यासाठी मुद्दामून शर्टाची बटणं वेगवेगळ्या बाजूला आहेत असा दावा करतात.

VIEW ALL

Read Next Story