रविंद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यासाठी नोबल पुरस्कार मिळाला होता.
सर चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. रमण यांना 1930 साली भौतिकशास्त्रसाठी नोबल मिळालाय.
वैद्यकशास्त्रसाठी 1968 साली नोबल मिळवणारे हरगोविंद खुराणा पहिले भारतीय होते.
तर शांततेचा नोबल पुरस्कार 1979 साली मदर टेरेसा यांना मिळाला होता.
सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 साली भौतिकशास्त्रसाठी पुरस्कार जाहीर झाला होता.
1998 अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार अमर्त्य सेन यांना देण्यात आला होता.
सर व्ही. एस. नायपॉल यांना 2001 साली साहित्यसाठी नोबेल जाहीर करण्यात आला होता.
रसायनशास्त्रामध्ये नोबल मिळवणारे पहिले भारतीय वेंकटरमणन रामकृष्णन होते. त्यांना 2009 मध्ये हा पुरस्कार मिळाला.
कैलाश सत्यार्थी यांना 2014 साली शांतता पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई यांच्यासह पुरस्कार देण्यात आला.
अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार एस्थर डुफ्लो यांच्यासह अभिजीत बॅनर्जी यांना 2019 मध्ये देण्यात आला होता.