'ही' आहे जगातील सर्वात विषारी चिमणी, कोब्रा सापाचं असतं विष

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Apr 14,2024

Poisonous Bird

जगात एक असा पक्षी आहे ज्यामध्ये असतं कोब्रा सापाचं विष. महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुंदर असलेल्या या पंखांमध्ये असतं हे विष. हाताला लागताच अर्धांगवायू येण्याची शक्यता. यामुळे जीवही जाऊ शकतो.

Hooded Pitohui

या पक्ष्याचं नाव आहे हुडेड म्हणजे गिनी पितोहुई. महत्त्वाचं म्हणजे ही चिमणी पापुआ न्यू गिनीमध्ये सापडते. स्थानिक लोक याला बकवास किंवा कचरा पक्षी म्हणून ओळखतात. म्हणूनच ही आहे अतिशय विषारी चिमणी.


बर्ड स्पॉटच्या रिपोर्टनुसार, अगोदर लोकांना या चिमणीच्या विषाबद्दल फार माहिती नव्हती. 1990 साली कॅलिफोर्निया एकॅडमी ऑफ सायन्सच्या इकोलॉजिस्ट जॅक डंबसरबद्दल माहिती मिळाली.

पंखाला हात लावताच जळजळ

पापुआ न्यू गिनीमध्ये हुड असलेल्या चिमण्यावर अभ्यास करत होते. याच दरम्यान चुकून पक्षीला जाळ्यातून सोडवताना हाताला चिमणीचे पंख लागले.


यामुळे जळजळ झाली आणि काही मिनिटांतच हात सुन्न पडला. जळजळ रोखण्यासाठी ते बोट तोंडात टाकले आणि काही क्षणातच ओठ आणि जीभेची जळजळ होऊ लागली. यानंतर चक्कर येऊन हॉस्पिटलमध्ये न्याव लागलं.


दोन वर्षांनंतर याबाबत अभ्यास करण्यात आला. या पक्ष्यामध्ये बैट्राचोटॉक्सिन असते ज्यामुळे विष निर्माण होते.

VIEW ALL

Read Next Story