दिवसाची सुरुवातच दात घासल्यानंतर सुरू होते. दात स्वच्छ ठेवण्यासाठी टुथब्रशचा वापर केला जातो
शरीराबरोबरच मौखिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
एकदा टुथब्रश वापरायला काढल्यानंतर कित्येत वर्ष तो वापरला जातो. मात्र ते चुकीचे आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे का? की टुथब्रश किती दिवसांनंतर बदलला पाहिजे
साधारणपणे 3 महिन्यांनंतर टुथब्रश बदलला पाहिजे. कारण फक्त पाण्याने साफ केल्यानंतर ब्रश साफ होत नाही
जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत एकच टुथब्रश वापरत असाल तर त्यामुळं दातांमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात
दीर्घकाळापर्यंत एकच टुथब्रश वापरल्यानंतर त्यात बॅक्टेरिया आणि जिवाणूंचा धोका वाढतो
टुथब्रशचे ब्रिसल्स कमजोर झाले की समजून जा तुम्हाला टुथब्रश बदलण्याची गरज आहे.