पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

28 मे रोजी म्हणजे येत्या रविवारी नव्या संसद भवानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होईल. या सोहळा नेमका कसा असेल याचा कार्यक्रम समोर आला आहे.

होम-हवन आणि पूजा

सकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान होम-हवन आणि पूजा केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि अनेक मंत्री उपस्थित राहाणार आहेत.

राजदंडाची स्थापना

सकाळी 8:30 ते 9 वा. दरम्यान लोकसभेत वैदिक परंपरेनुसार राजदंडाची स्थापन केली जाईल. यासाठी तामिळनाडूतल्या मठातून 20 संत हजर असणार आहेत.

प्रार्थना सभेचं आयोजन

सकाळी 9 ते 9:30 दरम्यान प्रार्थना सभेचं आयोजन केलं जाईल. यात शंकराचार्य यांच्यासहित अनेक विद्वान पंडित आणि साधूसंत उपस्थित असतील.

राष्ट्रगीतापासून सुरुवात

कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दुपारी 12 वाजल्यापासून राष्ट्रगीतापासून सुरु होईल. यानंतर दोन लघूपट दाखवले जाणार आहेत.

विरोधी पक्षनेत्यांचं भाषण

राज्यसभेत विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण होईल. खरगे यांनी विरोधी पक्षाचा राजीनामा दिला आगे. पण त्यांचा राजीनामा अदयाप मंजूर करण्यात आलेला नाही.

विरोधकांचा बहिष्कार

पण काँग्रेसने या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरगे यांच्या भाषणाविषयी साशंकता आहे.

नाणी आणि शिक्क्यांचं अनावरण

लोकसभा स्पीकरचंही भाषण होईल, त्यानंतर नाणी आणि शिक्क्यांचं अनावरण केलं जाणार आहे.

पंतप्रधान मोदींचं भाषण

कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता कार्यक्रमाची सांगता होईल.

2020 मध्ये भूमीपूजन

पीएम मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नव्या संसद भवन इमारतीचं भूमीपूजन केलं होतं. या इमारतीच्या बांधकामाला 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

भव्य-दिव्य इमारत

चार मजल्यांच्या या इमारतीत 1224 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पुस्तकालय, समिती कक्ष, भोजप क्षेत्र, पुरेशी पार्किंग व्यवस्था असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story