आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात चहाचे सेवन करत असतो.
अनेक जण म्हणतात की चहाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त आहेत.
चहा प्यायलानं एसिडिटी होते. हे जरी खर असलं तरी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चहाचे अनेक फायदे आहेत.
केसांची निगा राखणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. वाढत्या प्रदूषणाच्या समस्या आपल्यालाही भेडसावत आहेत.
तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या केसांसाठी निगा राखणं गरजेचे आहे. चहा पावडर तुम्हाला यात मदत करू शकते.
तुम्ही काळा चहा घ्या आणि रंग येईपर्यंत तो ठेवा. त्याचे हे पाणी केसांना लावा आणि 40-45 मिनिटे ठेवा.
यातील टॅनिक एसिड तुम्हाला केस काळे होण्यास मदत होते आणि सोबतच तुमच्या केसांची वाढही होते.