लाखोंचं सोनं, आलिशान गाड्या; स्टायलिश कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची संपत्ती किती?

कॅबिनेटमंत्री

लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी मोदी सरकार 3.0 मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली.

अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री

आज चिराग पासवान यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये जल्लोषाचं वातावरण पहायला मिळतंय.

हाजीपूर

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांनी बिहारमधील हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवला तर त्यांच्या पक्षाने पाच जागा जिंकल्या.

स्टायलिश मंत्री

चिराग पासवान सध्या सोशल मीडियावर स्टायलिश मंत्री म्हणून ओळखले जात आहेत. मात्र, चिराग पासवान यांची संपत्ती कितीये? तुम्हाला महितीये का?

एकूण मालमत्ता

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, चिराग पासवान यांच्याकडे 2.68 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.

सोन्याचे दागिने अन् फॉर्च्युनर कार

चिराग पासवान यांच्याकडे 14 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तर त्यांच्याकडे एक फॉर्च्युनर कार तर सुमारे 5 लाख रुपये किमतीची जिप्सी त्यांच्या नावावर आहेत.

लाखोंची गुंतवणूक

चिराग पासवान यांनी सहा कंपन्यांमध्ये सुमारे 35 लाख 91 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच पाटण्यातील श्रीकृष्णापुरी येथे त्यांच्या नावावर एक आलिशान घर त्यांच्या नावावर आहे.

VIEW ALL

Read Next Story