प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?

प्लास्टिक ग्लास हे हलके, स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो. पण प्लास्टिकमध्ये बिस्फेनॉल A आणि फथालेट्ससारखी रसायने असतात जी आरोग्यासाठी घातक असतात.

काचेचा ग्लास हा एक क्लासिक आणि पारंपारिक असून काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्यास त्याचा पाण्यावर कोणतीही रासायनिक परिणाम होत नाही. त्यामुळे काचेच्या ग्लासमध्ये पाणी पिणे सुरक्षित आणि चांगल मानलं जातं.

तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे हे आयुर्वेदात फायदेशीर मानलं जातं. तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने शरीरातील तांब्याची कमरता भरून निघते. तांब्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असल्याने पाणी स्वच्छ आणि शुद्ध राहतं.

स्टीलचे ग्लास मजबूत आणि टिकाऊ असल्याने ते तुटण्याची भीती नसते. शिवाय ते आरोग्यास धोकादायक नसतात.

स्टील नॉन रिस्पॉन्सिव मेटेरियल असल्याने पाण्यासोबत रासायनिक प्रक्रिया होत नाही. स्टीलचा पुनर्वापर केला जाऊ शकत असल्याने ते पर्यावरणपूरक असतात.

त्यामुळे पाणी पिण्यासाठी काचेचा, तांब्याचा आणि स्टील ग्लास आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

VIEW ALL

Read Next Story