नूडल्स, मासे, दारू.... भारतातील 'या' मंदिरांमध्ये मिळतो विचित्र प्रसाद

प्रसाद

तुम्हाला माहितीये, देशात काही अशी मंदिरं आहेत जिथं अगदी विचित्र प्रसाद भाविकांच्या हातावर दिला जातो.

करणी माता

राजस्थानातील करणी माता मंदिरात भाविकांना उंदरांनी उष्टवलेला प्रसाद दिला जातो.

थ्रिसूर महादेव मंदिर

केरळातील थ्रिसूर महादेव मंदिरात भाविकांना प्रसादाऐवजी सीडी आणि पाठ्यपुस्तकं दिली जातात.

बालसुब्रमण्यम मंदिर

केरळातील या मंदिरात बालामुरूगन देवापुढे चॉकलेटचा नैवेद्य दाखवून तोच प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो.

खबीस बाबा मंदिर

उत्तर प्रदेशातील खबीस बाबा मंदिरात भाविकांना दारू/ मद्याचा प्रसाद दिला जातो.

कामाख्या मंदिर

या मंदिराच्या यात्रेदरम्यान भाविकांना ओलं कापड प्रसाद म्हणून दिलं जातं. देवीच्या आशीर्वादामुळं ते ओलसर असतं असं म्हणतात.

अलागार मंदिर

तामिळनाडूतील अलागार मंदिरात विष्णूची पुजा होते. इथं भाविकांना प्रसादात डोसा दिला जातो.

मुथप्पनन मंदिर

केरळातील या मंदिरात देवापुढं मासळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि पुढं हेच मासे भाविकांना प्रसादात दिले जातात.

काली मंदिर

कोलकात्यातील काली मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून चायनीज दिलं जातं.

VIEW ALL

Read Next Story