चांदणं चांदणं झाली रात...

चांदणं चांदणं झाली रात...; भारतातील 'या' ठिकाणी दर पाहता येतात चंद्राची बहुविध रुपं

लामायुरू

लेहपासून 150 किमी अंतरावर असणारं हे ठिकाण म्हणजे लामायुरू

मूनलँड

लामायुरू मूनलँड म्हणूनही ओळखलं जातं. हे देशातील एकमेवाद्वितीय ठिकाण ठरणार आहे.

दावा केला आहे की ...

अनेकांनी असा दावा केला आहे की संपूर्ण जगात अशी एकच जागा आहे. लामायुरूमध्ये होणारी रात्र तुम्हाला भारावणारी ठरते.

असंख्य चांदण्यांची गर्दी

लामायुरू मूनलँडमध्ये रात्रीच्या वेळी आभाळामध्ये असंख्य चांदण्यांची गर्दी असते दाटीवाटीनं असणारे चांदण्यांचे हे पुंजके पाहताना आपली नजर हटत नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे...

अनेकांच्या मते हा दुसऱ्याच दुनियेतील प्रकाश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या भागात कोणतीही हिरवळ नाही, तिथं निसर्ग ही किमया दाखवतो. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार इथं हिमालयामुळं हे रंग परावर्तीत होतात आणि एक सुरेख प्रकाश या भागात पसरतो.

पाण्याचा लवलेषही नाही

लामायुरू येथे आल्यानंतर आपण एका वेगळ्याच दुनियेत आल्याची अनुभूती तुम्हालाही होईल. जाणकार आणि अभ्यासकांच्या मते इथं एक तलावही असायचा. आता मात्र या तलावाच पाण्याचा लवलेषही नसून फक्त धारदार खडकच आहेत.

VIEW ALL

Read Next Story