चांद्रयानमुळे इस्रो जगभरात चर्चेत

चांद्रयान-3 मोहिमेमुळे सध्या जगभरामध्ये इस्रोची चर्चा आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांपासून तर चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरच्या माध्यमातून येणाऱ्या माहितीमुळे इस्रो चर्चेत आहे.

लोगोचा अर्थ काय

तुम्ही सुद्धा मागील काही दिवसांमध्ये अनेकदा इस्रोबद्दल ऐकलं असेल. इस्रोचा लोगो पाहिला असेल. पण या लोगोचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का? हेच जाणून घेऊयात...

नवीन लोगो स्वीकारला

2022 साली ऑगस्ट महिन्यामध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं अर्थात इस्रोनं सध्याचा नवीन लोगो स्वीकारला.

भरपूर ऊर्जा आणि चैतन्यचं प्रतिक

"Vibrant, Dynamic And Symbolising a lot of energy and vitality" असं या लोगोचं वर्णन करण्यात आलं होतं. म्हणजेच भरपूर ऊर्जा आणि चैतन्यचं प्रतिक असलेला हा लोगो आहे.

उपग्रहाचं प्रतिक

2022 साली स्वीकारण्यात आलेल्या नवीन लोगोमध्ये, ऊर्जा प्रदान करणारे दोन सौर अॅरो हे उपग्रहाचं प्रतिक मानलं जातं.

लॉन्च व्हेइकलचं प्रतिक

वरच्या दिशेने जणाऱ्या बाणाच्या टोकाप्रमाणे असलेला हा लोगो लॉन्च व्हेइकलचं प्रतिक आहे. उंच भरारी घेत अवकाशातील वेगवेगळ्या शोध घेण्याचं हे प्रतिक आहे.

बाणाचा अर्थ काय?

ISRO चे अधिकृत जर्नल 'स्पेस इंडिया'च्या 2002 च्या आवृत्तीनुसार, लोगोमध्ये वरच्या दिशेने जाणारा बाण हा वरच्या दिशेने जाणारी म्हणजेच सातत्याने प्रगती करणारी गतिशीलता दर्शवतो.

फॉण्ट कोणता?

या लोगोमध्ये ISRO हे नाव देवनागरी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. या लोगोमध्ये वापरण्यात आलेल्या फॉण्टचं नाव 'प्राकृत' अशं आहे. हा फॉण्ट देवनागरी लिपीशी साधर्म्य साधणारा आहे.

निळा अन् भगवा रंग काय सांगतो

लोगोमध्ये भगवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे. काही दाव्यांनुसार भगवा रंग हा भारतीय तिरंग्याबरोबरच अग्नी दर्शवतो तर अवकाशाचा रंग म्हणून निळा रंग वापरण्यात आला आहे.

महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा

नवीन लोगो अंतराळ क्षेत्रातील इस्रोच्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा दर्शवतो, असं 'स्पेस इंडिया'मध्ये म्हटलं होतं.

VIEW ALL

Read Next Story