चहाची गाळणी ही दररोज लागणारी वस्तू आहे. रोज रोज वापरून चहाची गाळणी काळपट आणि चिकट होते. कितीही घासली तरी ते चिकट डाग जात नाहीत.
चहाच्या गाळणीवरीव चिकट व हट्टी डाग साफ करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत.
एक कप पाणी, दोन चमचे बेकिंग सोडा, एक मोठा चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर आणि एक ब्रश
सगळ्यात पहिले एका भांड्यात पाणी कडकडीत उकळून घ्या. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा टाका
या पाण्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाका. त्यानंतर पाण्याला फेस आलेला तुम्हाला दिसेल.
आता या मिश्रणात तुमची चहाची गाळणी टाका. जवळपास 10 मिनिटे या पाण्यात गाळणी भिजत ठेवा
10 मिनिटे गाळणी भिजत ठेवल्यानंतर ब्रशने गाळणी साफ करुन घ्या. त्यानंतर गाळणी पाण्याने स्वच्छ करुन घ्या