इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा

इस्रोनंतर चंद्रावर जाण्यासाठी अनेक देश रांगेत आहेत. भारतानंतर जपानने 7 सप्टेंबर रोजी आपले मून मिशन लॉंच केले.

यावर्षी आणखी दोन चंद्र मिशन होणार असून हे दोन्ही अमेरिकेकडून केले जाणार आहेत.

नासाने या मिशनचे नाव कॉमर्शियल लूनर पॅलोड सर्व्हिसेस आणि लूनर ट्रेलब्लेजर असे ठेवले आहे.

लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल.

2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल.

2024 मध्ये अमेरिका वोलाटाइल इन्व्हेटिगेटिंग पोलर एक्सप्लोरेशन रोव्हर पाठवणार आहे. हा चंद्राच्या अंधार असलेल्या भागात आणि दक्षिण धुव्रावर संशोधन करेल.

2025 मध्ये नासाचे अर्टेमिस-2 लॅंडर चंद्रावर उतरेल. याद्वारे 50 वर्षानंतर पहिल्यांदाच मनुष्य चंद्रावर पोहोचेल.

2024 ते 2027 मध्ये चीन आपले चांगाई-6, चांगाई-7 आणि चांगाई-8 मिशनवर पाठवले जाईल. हे चंद्रावर रिसर्च करणारे रोबोटिक रिसर्च स्टेशन असतील.

2024 मध्ये जापान हाकुतो-2 आणि हाकुतो-3 मिशनवर पाठवेल. हेदेखील एक लॅंडर आणि ऑर्बिटर मिशन असेल.

ऑस्ट्रेलियादेखील मून मिशनच्या तयारीत आहे. ते नासाच्या अर्टमिस मून मिशनसोबत आपले रोव्हर पाठवेल. हे मिशन 2026 पर्यंत पूर्ण होईल.

VIEW ALL

Read Next Story