समांथा रुथ प्रभू लवकरच राजकारणात? 'या' पक्षाकडून करणार राजकीय इनिंगचा श्रीगणेशा?

समांथा रुथ प्रभू

समांथा रुथ प्रभूनं अभिनय क्षेत्रातून सध्या ब्रेक घेतला आहे.

का घेतला ब्रेक?

समांथाला गेल्यावर्षी ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हणजेच मायोसायटिस या आजाराचे निदान झाले होते. त्यामुळे तिनं ब्रेक घेतला आहे.

समांथा राजकारणात करणार प्रवेश?

'न्यूज 18' आणि 'इंडिया हेराल्ड' च्या रिपोर्ट्सनुसार, समांथा राजकारणात प्रवेश करण्यासाठी तयार आहे. अजून या विषयी कोणतीही थेट माहिती समोर आलेली आहे.

का आहेत चर्चा?

दरम्यान, आता चर्चा अशी सुरु आहे की ब्रेकनंतर समांथा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जाते.

शेतकऱ्यांचे करते समर्थन

समांथा ही नेहमीच शेतकऱ्यांचे समर्थन करताना दिसते. आधी देखील तेलंगनाच्या शेतकऱ्यांचे समर्थन करताना दिसला आहे. इतकंच नाही तर ती हॅन्डलूम कपड्यांच्या ब्रँडची अम्बॅसीडर आहे.

कोणत्या पार्टीत होणार सहभागी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशा चर्चा आहेत की समांथा हे के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिति (BRS) या पक्षात सहभागी होणार.

कोणीही दिला नाही दुजोरा

समांथा किंवा के. चंद्रशेखर राव या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही किंवा त्यांच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीनं या बातमीवर शिक्का मोर्तब केलेला नाही. (All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

VIEW ALL

Read Next Story