फुफ्फुसाचा कर्करोग

धूम्रपान केल्यामुळे, शरीरात फुफ्फुसांशी संबंधित बर्‍याच समस्या सुरू होतात. फुफ्फुसांचा कर्करोग विकसित होण्याच्या तीव्र जोखमीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी धूम्रपान जबाबदार आहे.

COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज)

धूम्रपानामुळे 'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज' (सीओपीडी) होण्याचा धोका अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.'सीओपीडी' हा फुप्फुसांचा आजार असून, त्यामुळे हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, तीव्र खोकला आदी लक्षणे जाणवतात.

हृदयरोग

धूम्रपान केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात आणि रक्तवाहिन्यांच्या पेशी खराब होऊ शकतात.

स्ट्रोक

धूम्रपान करणाऱ्यांमध्ये स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो .धूम्रपान करणारे हायपरटेन्शनला बळी पडतात आणि अखेरीस त्यांना स्ट्रोक होतो.धूम्रपान केल्यामुळे धमन्यांमध्ये ताठरपणा येतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

दमा

जास्त धुम्रपान करत असल्यामुळे दम्याचा धोका वाढतो.

पुनरुत्पादक प्रभाव

धूम्रपान केल्याने नर व मादी यांच्या पुनरुत्पादक प्रणालीस हानी पोहचू शकते आणि त्यानंतर वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.

अकाली जन्मलेली, कमी वजनाची बाळे

धूम्रपान केल्यामुळे गर्भाची हानी होऊ शकते किंवा त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अकाली प्रसूती होण्याचा धोका असू शकतो.गरोदरपणात धूम्रपान केल्याने बाळाचे वजन कमी होते, ज्यामुळे नवजात मुलासाठी धोका निर्माण होतो.

मधुमेह

मानवी शरीरात मधुमेह होण्याचे एक कारण म्हणजे धूम्रपान. संशोधनात असे दिसून आले आहे की धूम्रपान करणार्‍यांना ३० ते ४० टक्के हा मधुमेह होण्याचा धोका असतो.

वय-संबंधित मॅक्युलर डीजनरेशन

वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशन (AMD) हा वृद्धत्वाशी संबंधित एक रोग आहे जो हळूहळू तीक्ष्ण, मध्यवर्ती दृष्टी नष्ट करतो.

अंधत्व, मोतीबिंदू

धूम्रपानाचा प्रत्‍यक्ष दृष्टीवर परिणाम होतो आणि अंधुक दिसणे, विकृती आणि दृष्टीच्‍या मध्‍यभागी ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट्स अशी लक्षणे दिसून येतात.

VIEW ALL

Read Next Story