एक बाब लक्षात घेण्याजोगी

इथं एक बाब लक्षात घेण्याजोगी. ती म्हणजे तुम्ही जर परदेशात आहात आणि तिथं तुम्हाला वाहन चालवायचं असेल, भारतीय परवानाही असेल तर तुम्ही ते चालवू शकता का?

Driving Permit

याचं उत्तर आहे 'नाही'. परदेशात तुम्ही भारतीय परवान्यावर वाहन चालवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला International Driving Permit चीच आवश्यकता आहे.

परवाना तेव्हाच मिळेल जेव्हा...

तुम्हाला इंटरनॅशनल वाहन चालनाचा परवाना तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्याडे भारताचं स्थानिक Driving Licence असेल. इथं देशाच्या नागरिकत्वाची अटही लागू होते.

अटींची पूर्तता केल्यानंतर...

वरील अटींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय Driving Licence साठी अर्ज दाखल करु शकता. ज्यासाठी तुम्हाला 4A फॉर्म भरावा लागणार आहे.

आरटीओ

आरटीओमध्ये जाऊन तिथं तुम्हाला इतर देशातील भेटीची कल्पना देऊन तुम्ही तिथं किती दिवसांसाठी थांबणार आहात याचीही कल्पना द्यावी लागेल.

प्राथमिक Driving Licence

आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी तुमच्याकडे प्राथमिक Driving Licence असणं गरजेचं असून, हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. त्याची एक प्रत तुम्हाला आरटीओमध्ये जमा करावी लागते.

पडताळणीसाठी ...

अर्जाच्या पडताळणीसाठी तुम्ही पासपोर्टसाईज फोटो, विमानाच्या तिकीटाची प्रतही जोडणं अपेक्षित असतं.

निर्धारित शुल्क

शासनाकडूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील या परवान्यासाठी निर्धारित शुल्क भरावं लागतं. हा परवाना मोफत मिळत नाही.

Form 4A

Form 4A सोबतच हा परवाना द्यावा लागतो. सर्व कागदोपत्री व्यवहार आणि इतर प्रक्रियांची पूर्तता झाल्यानंतर परवाना येण्याचा दिवस जवळ येईल.

परवाना घरपोच

अवघ्या 5 कार्यालयीन दिवसांमध्ये तुमच्या निवासी पत्त्यावर भारतीय पोस्ट सेवेमार्फत हा परवाना पोहोचवला जातो.

VIEW ALL

Read Next Story