why board on highway and roads in green colors : जेव्हाही आपण रस्ता किंवा महामार्गावरून जातो तेव्हा रस्त्यावर अनेक प्रकारचे फलक दिसतात. यामध्ये एका बोर्डावर ठिकाणांची नावे आणि अंतर लिहिलेले असतात. तुम्ही सर्वांनी तो बोर्ड पाहिला असेल. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे बोर्ड हिरव्या रंगाचे का असतात?
तुम्ही कधी विचार केला आहे का की हे हिरव्या रंगाचे बोर्ड का असतात? हे हिरवे बोर्ड पांढऱ्या रंगात लिहिलेले असतात.
रस्त्यावरील हिरव्या बोर्डबाबत काहींना याची माहिती असेल, तर अनेकांना माहिती नसते.
महामार्ग आणि रस्त्यांवर हिरवे फलक का लावले जातात हे तुम्हालाही माहिती नसेल तर आज नक्की जाणून घ्या.
वास्तविक, हिरव्या रंगाचा बोर्ड वापरला जातो, कारण त्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येत नाही. म्हणूनच हा हिरवा रंग वापरला जातो.
याशिवाय हिरव्या रंगावर लिहिलेली गोष्ट तसेच अक्षरे रात्री सहज दिसतात.
इतकेच नाही तर लोकांना हा रंग दूरुनच दिसतो. त्यामुळेच रस्ते आणि महामार्गांवर नेहमी हिरव्या रंगाचे फलक लावले जातात.