तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील. तेव्हा समजून जा की तुम्ही चूकीच्या मार्गावर चालत आहात.
स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल.
आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या.
मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे.
हे जग एकप्रकारची व्यायामशाळाच आहे. जिथे आपण स्वत:ला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो
जो व्यक्ती सांसारिक गोष्टींच्या लोभात अडकत नाही त्यानंच खऱ्या अर्थानं अमरत्व प्राप्त केलंय असं समजावं.
उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.