भटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....
भटकंतीचे बेत आखणं हा तुमचा आवडता छंद असेल आणि याच क्षेत्रात तुम्ही सक्रिय असाल तर ही माहिती तुमच्यासाठी...
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, पर्यटनासाठी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं वापरात आणण्यासाठी आता केंद्र सरकारच योजना आखत आहे.
एकात्मिक वाहतूक योजना या स्वरुपातील योजनेमध्ये शासनातर्फे एका अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना उत्तमोत्तम वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
रस्तेमार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी दूर करून त्यांचा प्रवास सुकर करण्याच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
सध्या एक जाणकारांची टीम या दृष्टीकोनातून काम करत असून, रस्ते, रेल्वे आणि वाहतुक मार्गावर लागू करण्यात येणाऱ्या या योजनेच्या दृष्टीनं अनेक बारकावे लक्षात घेतले जात आहेत.
या अॅपचा वापर करण्यासाठी पर्यटकांना प्रवासाचा तपशील द्यावा लागणार आहे. अपेक्षित ठिकाण, प्रवासाची तारीख असा तपशील देणं बंधनकारक असेल. माहिती दिल्यानंतर अॅपमार्फत तुम्हाला वाहतुकीचे सर्वोत्तम पर्याय आणि तत्सम इतरही गोष्टींची माहिती एकाच ठिकाणी देणार आहे.
सरकारतर्फे तयार करण्यात येणारं हे अॅप वापरात आल्यानंतर आता कोणा एका माध्यमावर ताण येणार नाही, शिवाय रेल्वेमध्येही प्राधान्याची जागा आणि बर्थही तुम्हाला ठरवता येणार आहे.
शासनाच्या अॅपमुळं प्रवाशांन वाहतुकीच्या उत्तमोत्तम सुविधा मिळणार आहेत. किंबहुना कुठे वाहतुकीच्या सुविधा नसतल्यास याबाबत प्रवाशांना पूर्वसुचनाही दिल्या जातील. (सर्व छायाचित्र- फ्रिपिक)