जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करायचं असेल तर एका जागी कमीत कमी बसा आणि शारिरीक हालचाल वाढवा. शक्य असल्यास सायकलिंग, डान्स, स्विमिंग आणि चालणं याकडे लक्ष द्या.
धुम्रपानामुळे तुमच्या ह्रदय आणि ह्रदयाच्या ठोक्यांवर फार जोर पडतो. धुम्रपान सोडल्यास, रक्तभिसरण आणि फुफ्फुसात सुधारणा होऊन HDL कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात सुधारणा होते.
मित्रासंह पार्टी करताना दारु पिणं अनेकांना कूल वाटतं. पण जर तुम्ही मद्याच्या आहारी गेला असाल तर आताच थांबवण्याची वेळ आहे.
अनेकदा आपण अशा गोष्टींचं सेवन करतो ज्यामध्ये ट्रान्स फॅट फार अधिक प्रमाणात असतं. ट्रान्स फॅट आपल्या आऱोग्यासाठी फार धोकादायक होतं. यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फार वाढतं.
अनेकदा लोक अशा चुका करतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तसंच राहतं. त्यामुळे तुम्ही काही सवयी आत्ताच सोडून देण्याची गरज आहे.
हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो करत तुम्ही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करु शकता.
रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असल्यास रक्तभिसरणाचा वेग कमी होतो, ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटका, स्ट्रोक अशा अनेक समस्या वाढतात.
शरिरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं फार धोकादायक ठरु शकतं. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.