पावसाळ्यात सर्व घरांमध्ये ओले कपडे कसे सुकवायचे याची फार चिंता असते.
कपडे सुकवण्यासाठी स्टँड सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यावर सहजपणे कपडे सुकवले जाऊ शकतात.
विशेष म्हणजे, तुम्ही घराच्या हव्या त्या कोपऱ्यात हा स्टँड ठेवू शकता. त्यामुळे जिथे हवा, उन आहे त्या जागेची निवड करु शकता.
कपडे लवकर सुकवायचे असतील तर ते व्यवस्थित पिळून जास्तीत जास्त पाणी काढा.
कपड्यांमधील पाणी काढल्यानंतर ते स्टँडवर सुकत टाका. वॉशिंग मशीन असेल तर ड्रायरच्या माध्यमातून हे काम सोपं होईल.
पावसात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही इस्त्रीचाही वापर करु शकता.
जीन्ससारख्या जाड कपड्याच्या काही भागांना सुकण्यास वेळ लागतो. तिथे इस्त्री वापरु शकतो.
कपडे सुकवण्यास वेळ लागत असेल तर ड्रायरही फार कामाची गोष्ट आहे.
कपडे सुकल्यानंतरही त्यात ओलावा असेल तर ड्रायर वापरु शकतो.