अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रा यावर्षी 1 जुलै ते 31 अॅगस्ट पर्यंत असणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेली अमरनाथ गुहा ही जगभरातील भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे

Jul 04,2023

सर्वात कठिण यात्रा

अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते. अमरनाथची यात्रा केली त्याचं जीवन सफल होतं असं बोललं जातं.

बर्फापासून शिवलिंग

दरवर्षी नैसर्गिक बर्फापासून सुमारे 10 फूट उंच शिवलिंग तयार होते. ज्याला हिमानी शिवलिंग असंही म्हणतात.

रजिस्ट्रेशन सुरु

या यात्रेचं रेजिस्ट्रेशन सुरु झालं असून ज्या व्यक्ती पहिलं रेजिस्ट्रेशन करेल त्याला पहिला प्रवेश दिला जातो.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन

भाविक http://jksasb.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन रेजिस्ट्रेशन करुन यात्रेचं तिकिट मिळवू शकतात.

62 दिवसांचा प्रवास

जुलैमध्ये सुरु होणारी या यात्रेचा 48 दिवसांचा प्रवास असतो. यावेळी पहिल्यांदा अमरनाथ यात्रा 62 दिवस चालणार आहे

यात्रेचे कडक नियम

अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी काही नियम आहेत आणि त्याचं पालन करणं प्रत्येक भाविकांसाठी अनिवार्य आहे

या लोकांना प्रवेश नाही

या नियमावलीमुळे अनेकांना अमरनाथ यात्रेची परवानगी देण्यात आली आहे. 13 वर्षाखालील मुलांना यात्रेची परवानगी दिली जात नाही.

गर्भवती महिलांनाबंदी

70 वर्षांवरील लोकांना देखील यात्रेची परवानगी नाही आहे, 6 आठवड्यांवरील गर्भवती महिला अमरनाथ यात्रेला जाऊ शकत नाहीत

जुलैमध्ये भाविकांना दर्शन

अमरनाथ गुहा श्रीनगरपासून 141 किमी अंतरावर 3888 मीटर उंचीवर आहे. वर्षभर ही गुहा प्रचंड बर्फामुळे झाकलेली असते. उन्हाळ्यात हा बर्फ वितळायला लागल्यावर काही काळ भाविकांसाठी खुला केला जातो.

VIEW ALL

Read Next Story