किचनमधील चिमनी-एग्जॉस्ट फॅन 'असा' करा स्वच्छ

वस्तूंवर तेलकट थर जमा

किचनमधील चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंवर तेलकट थर जमा होतो. त्यामुळे या वस्तू स्वच्छ करणं म्हणजे डोकेदुखी ठरतं.

वस्तू कशा स्वच्छ करायच्या?

खूप मेहनत घेऊनही या वस्तू स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे या वस्तू कशा स्वच्छ करायच्या जाणून घेऊया.

आधी स्वत:ची काळजी घ्या

वस्तू स्वच्छ करताना मास्क आणि हातमोजे घाला. साफसफाई करताना विजेचा झटका लागू नये यासाठी जोडलेले सर्व प्लग किंवा वायर डिस्कनेक्ट करा.

अमोनिया

अर्धा कप अमोनिया मिसळलेल्या गरम पाण्यात ब्लेड्स बुडवा. जाळी आणि ब्लेड किमान एक तास मिश्रणात बुडवून ठेवू द्या. यामुळे घाण बाहेर येईल.

लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मीठाचा वापर करून एक्झॉस्ट फॅन करू शकता. यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण गरम पाण्यात मिसळा आणि ब्लेडने स्वच्छ करा.

इनो आणि लिंबू

एका वाडग्यात गरम पाणी घ्या. त्यात इनो आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट काही वेळ पंख्यावर घासून ठेवा. मग तुम्ही ते स्वच्छ कापडाने पुसून टाका. तुमचा पंखा काही मिनिटांत स्वच्छ होईल.

बेकिंग सोडा

लिंबू किंवा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांसारख्या पदार्थांचा वापर करून जाळी न काढता मागील बाजूने फॅन ब्लेड साफ करू शकता.

डिटर्जंट मिश्रित पाणी

सर्वात आधी डिटर्जंट मिश्रित पाण्यानं ब्लेड स्वच्छ करा. त्यानंतर लिंबू किंवा व्हिनेगर आणि बेकिंग सोडाच्या मदतीने स्वच्छ करा.

डिस्क्लेमर

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story