सिलेंडर टाकीमध्ये गॅसची पातळी कशी ओळखावी, पाहा ट्रिक...

गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणस्नेही आणि निरोगी इंधन मानले जाते.

घरगुती वापराव्यतिरीक्त औद्योगिक आणि व्यापारी कारणांसाठी गॅस सिलेंडरचा सर्वाधिक वापर केला जातो.

अनेकदा घरी जेवण बनवताना अचानक गॅस सिलेंडर संपून जातो. अशा परिस्थितीत आपली पंचायत होते.

परंतु सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे ? हे तुम्ही टॅावेलच्या साहाय्याने तपासु शकता .

एक टॅावेल ओला करुन तो सिलेंडरच्या भोवती गुंडाळुन ठेवावा.

काही वेळानंतर सिलेंडरला गुंडाळलेला ओला टॅावेल बाजुला करावा.

त्यानंतर सिलेंडरच्या टाकीचे निरीक्षण करा. टाकीचा कोणता भाग लवकर वाळतोय आणि कोणता भाग ओला राहतोय हे पाहा.

गॅस सिलेंडच्या टाकीवरील ओला- सुका भाग तपासा. त्यावरुन आपल्याला गॅस सिलेंडरमधील गॅसचा अंदाज समजेल.

सिलेंडर टाकीचा भाग ज्या पातळीपर्यंत ओला राहिला आहे, तेवढा गॅस शिल्लक आहे असे समजावे.

सिलेंडर टाकीचा ज्या भागापर्यंत टाकी कोरडी दिसते त्या पातळीपर्यंत गॅस संपलेला आहे असे समजावे.

VIEW ALL

Read Next Story