रेल्वेचा अख्खा डबा कसा बुक करायचा? खर्चही जाणून घ्या...

लग्न किंवा एखाद्या ग्रुप पिकनिकला ट्रेनने जाताना जास्त तिकीट काढाव्या लागतात. याऐवजी तुम्ही पूर्ण कोच बुकींग करु शकता.

ग्रुपने फिरण्यासाठी तुम्ही ट्रेनचा पूर्ण डबा बुक केला तर तुम्हाला 50,000 रुपये द्यावे लागतील.

याशिवाय 18 डब्यांची संपूर्ण ट्रेन बुक करायची असेल तर तुम्हाला 9 लाख रुपये मोजावे लागतील.

याशिवाय तुम्हाला 7 दिवसांनंतर प्रत्येक हॉल्टिंग स्टेशनसाठी 10,000 रुपये वेगळे द्यावे लागतील. यासाठी 6 महिने किंवा 30 दिवस अगोदर बुकिंग करणे आवश्यक असते.

सर्व प्रथम, IRCTC च्या FTR वेबसाइट www.ftr.irctc.co.in वर जा.

युजर आयडी बनवा. नसेल तर तुम्हाला दुसरा आयडी तयार करा.

वेबसाइटवर कोच आणि ट्रेन बुक करण्याचा पर्याय मिळेल, ज्यावर क्लिक करा.

प्रवासाशी संबंधित संपूर्ण माहिती भरा. ज्यामध्ये प्रवासाची तारीख आणि कोचची माहिती द्या.

यानंतर पेमेंट पूर्ण केल्यावर तुमचे बुकिंग पूर्ण होईल.

VIEW ALL

Read Next Story