सोलन शहरातील दरबार हॉल इथं हिमाचल प्रदेशला ही ओळख मिळाली होती. 28 जानेवारी 1948 रोजी त्यासाठीची बैठक दरबार हॉलमध्ये पार पडली होती.
बैठकीत डॉ. यशवंत सिंह परमार आणि स्वातंत्र्यसैनिक पद्मदेव यांचा समावेश होता.
परमार यांना उत्तराखंडच्या जौनसर बाबर क्षेत्रातील काही भागही हिमाचल प्रदेशात समाविष्ट करून घ्यायचा होता. पण, राजा दुर्ग सिंह यांचा यास विरोध होता.
परमार यांना या प्रदेशाला हिमालयन एस्टेट हे नाव द्यायचं होतं.
राजा दुर्ग सिंह यांची पसंती मात्र हिमाचल प्रदेश या नावाला होती.
विद्वान आचार्य दिवाकर दत्त शर्मा यांनी हिमाचल प्रदेश हे नाव सुचवलं होतं. शेवटी राजे सिंह साहेबांनी या राज्याला हिमाचल प्रदेश हेच नाव आणि एक नवी ओळख देऊ केली.