गुजरात भाषिकांचा व्यवसायात डंका

गुजरातींनी व्यवसायातही प्रावीण्य मिळवले आहे. त्या सर्व गुजराती बांधवांना गुजरात स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

जिथे गुजराती तिथे गुजरात

आज जगात असा एकही देश नाही जिथे तुम्हाला गुजराती सापडणार नाहीत. गुजरातीमध्ये एक म्हण आहे की जिथे गुजराती तिथे तिथे सदैव गुजरात.

गरबा जगभरात प्रसिद्ध

गुजरातच्या चालीरीती, साहित्य, लोकगीते, बालगीते, लग्नगीते, कविता, गझल, नजमो, अध्यात्मिक, नैसर्गिक, ऐतिहासिक ठिकाणे, सर्व काही आश्चर्यकारक आहे. आज जगभरातील लोक गुजराती गरब्याच्या तालावर नाचतात.

जगातील श्रीमंतही गुजरातीच

जगातील सर्वात वरच्या श्रीमंत लोकांच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि अदानी हे देखील गुजराती आहेत. मात्र व्यवसायाठी त्यांनी मुंबई गाठली आहे.

दोन राज्यांना विरोध करणारे मोरारजी देसाईही गुजरातीच

गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्ये व्हावीत या चळवळीचे प्रमुख नेते इंदुलाल याज्ञिक हेही गुजराती होते आणि त्यांचे विरोधक मोरारजी देसाई हेही गुजरातीच होते.

गुजरातमध्येच महात्मा गांधींचा जन्म

गुजरात हे तेच राज्य आहे, जिथून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे महात्मा गांधी यांचाही जन्म झाला आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचाही जन्म इथेच झाला.

1 मे रोजी गुजराती दिवस का?

1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली, तर गुजरातची निर्मिती 2 मे 1960 रोजी झाली. मात्र, महाराष्ट्र दिनासोबतच गुजरात दिनही 1 मे रोजीच साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

VIEW ALL

Read Next Story