भारत सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमनं एक पोस्ट शेअर करत खातेधारकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
सध्या सायबर क्राईमअंतर्गत स्कॅमर्सनी असा मेसेज तयार केला आहे, ज्यामध्ये एसबीआयच्या रिवॉर्ड पॉईंट्सचा उल्लेख करण्यात आला आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या X अकाऊंटवरूनही हा मेसेज फसवा असल्याचं सांगत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे
पीआयबीच्या माहितीनुसार एसबीआयच्या या फेक मेसेजमध्ये लिंक आणि APK फाईल शेअर करण्यात आलेली आह. हा एक टेक्स्ट मेसेज असून, त्याच्या टायटलमध्ये SBI Reward चा उल्लेख आहे.
9980 रुपयांच्या पॉईंटचा उल्लेख असणाऱ्या या मेसेजमध्ये हे पॉईंट रिडीम करता येऊ शकतात असं सांगत अॅप Install करण्यास सांगितलं गेलं आहे.
मेसेजमध्ये असणारी एपीके फाईल स्कॅमर फोनमध्ये इन्स्टॉल करत तुमची सर्व खासगी माहिती मिळवू शकतात. तुमचा OTP आणि बँकेच्या माहितीपासून सर्वकाही या स्कॅमर्सच्या हाती लागू शकतं.
या फसल्या मेसेजच्या माध्यमातून फक्त तुमची फसवणूकच नव्हे, तर तुमच्या नावे कोणी कर्जही घेऊ शकतं. त्यामुळं कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध व्हा!