तुम्हाला किचन गार्डनिंगची आवड असेल तर घरच्या गार्डनमध्ये तुम्ही कांद्याचे झाड लावू शकता.
घरी कांद्याच झाड लावल्यानं तुम्हाला ताजी भाजी खायला मिळेल. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील.
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तुम्ही कांद्याचं झाड लावू शकता. यासाठी मोठी कुंडी किंवा ग्रो बॅग वापरु शकता.
माती आणि पाण्यात गोबरचे खत मिश्रित करा. किंवा इको फर्टिलायजरचा वापर करा.
ज्या कांद्याचे हिरवे अंकूर बाहेर आले आहेत, असं रोप निवडा.
मातीमध्ये कांद्याचं रोप लावल्यानंतर वरुन खत टाकू नका. अन्यथा रोप खराब होईल.
कांदा पूर्णपणे मातीत असले आणि हिरवे रोप जमिनीच्या वर असेल याची काळजी घ्या.
उन आणि सावली दोन्ही येत असेल अशा ठिकाणी रोप ठेवा.
कांद्याच्या रोपाला जास्त देखभालीची गरज नसते. हे काही दिवसातच भरलेले दिसेल.